Bastar: The Naxal Story: 2023 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ दिल्यानंतर आता निर्माता विपुल अमृतलाल शाह आणखी एक धक्कादायक कथा आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar: The Naxal Story) ज्यामध्ये अदा शर्मा (Adha Sharma) पुन्हा एकदा तिचा दमदार अभिनय करताना दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे मुहूर्ताचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले होते, तेव्हापासून चाहते चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर येण्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत नुकतेच या चित्रपटाचे तीन नवीन पोस्टर शेअर करण्यात आले असून त्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय.
‘बस्तर: द नक्सल स्टोरी’चे पोस्टर रिलीज
‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अनेक लोक रस्त्यावर लटकताना दाखवले आहेत. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये कमांडो बनलेली अदा शर्मा हातात बंदूक घेऊन दिसत आहे. तिसरे पोस्टर ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’च्या खलनायकाची ओळख करून देते. हे पोस्टर्स पाहून नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांशी लढण्याची तयारी अदा करत असल्याचे दिसते. या पोस्टर्ससोबतच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये लिहिलेल्या तारखेनुसार, हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे तिन्ही पोस्टर शेअर करताना अदाने लिहिले की, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या धाडसी कथाकारांपैकी एक असलेला ‘बस्तर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा: Hritik Roshan आणि Deepika Padukone च्या Fighter चित्रपटाचा Trailer रिलीज, ‘या’ दिवशी झळकणार सिनेमागृहात
अदा शर्मा साकारणार तगडी भूमिका
‘बस्तर’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. विपुल अमृतलाल शाह या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘द केरळ स्टोरी’ मधील तिच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकल्यानंतर अदा या चित्रपटात आणखी एक तगडी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती आयजी नीरजा माधवनची भूमिका साकारत आहे. अदा या व्यक्तिरेखेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.