DGCA SOP For Airlines: दाट धुक्यामुळे उड्डाणांना सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. इंडिगो फ्लाइटमधील होणार वाद आणि 17 तासांपर्यंत उड्डाण विलंबाच्या अनेक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सोमवारी एसओपी (SOP) जारी केली आहे. हवामानाच्या परिस्थितीत उड्डाण रद्द करण्याबाबत एअरलाइन्सना हा एसओपी जारी करण्यात आला आहे. यानुसार, विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणे उशीर झाल्याची अचूक माहिती प्रवाशांना द्यावी लागणार आहे.
प्रवाशांना विमान कंपनीच्या संबंधित वेबसाइट, एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे आगाऊ माहिती द्यावी लागेल. या एसओपीमध्ये एअरलाइन कर्मचार्यांशी योग्य संवाद साधणे आणि त्यांना सतत मार्गदर्शन करणे देखील म्हटले आहे.
जास्त विलंब झाल्यास एअरलाइन्स उड्डाणे करू शकतात रद्द
यासोबतच डीजीसीएने जास्त उशीर झाल्यास उड्डाणे रद्द करण्यास सांगितले आहे. एसओपीनुसार, धुके आणि प्रतिकूल हवामानामुळे, एअरलाइन्स त्या फ्लाइट अगोदर रद्द करू शकतात ज्यांना 3 तासांपेक्षा जास्त उशीर होऊ शकतो. गर्दी कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे विमानतळ आणि प्रवाशांची गैरसोयही कमी होईल.
हे देखील वाचा: Airport Passengers Dinner Video: विमानतळ बनले ‘बस स्टँड’, विमानाजवळील डांबरी रस्त्यावर प्रवाशांनी जेवायला केली सुरुवात; पाहा व्हिडिओ
प्रवाशांसाठी सुविधा
डीजीसीएने नागरी विमान वाहतूक आवश्यकता (CAR) विभाग-3, मालिका M भाग IV देखील जारी केला आहे. यामध्ये बोर्डिंग नाकारणे, उड्डाणे रद्द करणे आणि विलंब झाल्यामुळे प्रवाशांना विमान कंपन्यांनी पुरवलेल्या सुविधांचा समावेश आहे.
डीजीसीए म्हणते की एअरलाइन्सना देखील तिकिटांवर CAR संदर्भ प्रकाशित करणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रवाशांना तिकिटावर CAR पाहता येणार आहे. विमान कंपन्यांना याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तथापि, डीजीसीएने म्हटले आहे की या तरतुदी कोणत्याही बळजबरीने किंवा असाधारण परिस्थितीत लागू होणार नाहीत.