Petrol Diesel Price Today 16th January 2024 in Marathi: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.66 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.15 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.
दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त झालं आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 43 पैशांची घसरण झाली आहे. पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी महागले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी महागलं आहे. याशिवाय गोवा, केरळ आणि तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे.
पाहा महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- पुण्यात पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
- नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे.